मुंबई- धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही. धनगर आरक्षणात कोणी आडकाठी आणली तर ही काठी उगारायला मागे-पुढे पाहणार नाही, असे वक्तव्य राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात केले होते. मात्र त्यांच्या या वक्यव्यावर त्या पलटल्या असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे त्या म्हणाल्या. हे विधान केल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंकजा मंत्रीमंडळाच्या बैठकीस देखील उपस्थित राहील्या आहेत.
धनगर आरक्षणाची जोरदार मागणी होत असताना, जोपर्यंत
धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही असे
वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. मात्र हे विधान केल्यानंतरच्या दुसऱ्याच
दिवशी पंकजा मंत्रीमंडळाच्या बैठकीत हजर राहील्याने त्यांच्यावर टीका होत आहे. याविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास
केला गेला. मी मंत्रालयात येणार नाही, असे म्हटले नव्हते.
धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हाला पुन्हा सत्तेत येता येणार नाही, असे म्हटले होते.